आता गुगल सर्चसाठी मोजावे लागणार पैसे; यूजर्सच्या खिशाला कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल सर्च हे आजकाल गरजेच आहे. आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर आपण थेट गुगलवर जाऊन सर्च करतो आणि आपल्याला हवी ती माहिती मिळवतो. गुगल सर्चमुळे आपलं जीवन सोप्प झालं आहे असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. पण आता गुगल सर्च करणं परवडणार नाही, कारण आता गुगल सर्चसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे (Google Search charges) लागणार आहेत. गुगल आपल्या यूजर्सना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सह प्रीमियम वैशिष्ट्ये देण्याच्या विचारात आहे. मात्र त्यासाठी यूजर्सना पैसे खर्च करावे लागतील.

एका रिपोर्टनुसार, गुगल आता सर्चमधूनही कमाई करण्याचा विचार करत आहे. द फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, येत्या काळात यूजर्सना गुगल सर्चमध्ये AI फीचर मिळेल, ज्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतील. Google चे हे जनरेटिव्ह AI सर्च फिचर कंपनीच्या Google One सदस्यता योजनेमध्ये जोडले जाऊ शकते. परंतु AI शिवाय तुम्हाला गुगल वर काही सर्च करायचं असेल तर आधीप्रमाणेच ते तुम्ही फ्री मध्ये सर्च करू शकतो. गुगलचे हे जनरेटिव्ह एआय फीचर कंपनीच्या नवीन बिझनेस मॉडेलचा एक भाग असू शकते असा अंदाज आहे

गुगलच्या या बिझनेस मॉडेलबाबत एक सर्व्हे करण्यात आला, ज्यामध्ये असं सिद्ध झालं कि, ७० टक्के युजर्सना गुगलचे सर्च फीचर मोफत वापरायचे आहे. तर त्याचवेळी 30 टक्के वापरकर्ते Google च्या सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्ससाठी पैसे मोजायला सुद्धा तयार आहेत. गुगलच्या AI सर्च फिचरमुळे यूजर्सना एक चांगला अनुभव मिळेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सुद्धा वापरकर्त्यांनी केली पाहिजे. हे फीचर्स कधी आणले जाईल याची माहिती अजून समोर आलेली नाही. पण लवकरच ते लाँच होण्याची शक्यता आहे.