आता भूकंपाबाबत अलर्ट मोबाईलवर येणार; गुगलने लाँच केली नवीन सिस्टीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गुगलचा 25 वा वाढदिवस आहे. या पंचवीस वर्षाच्या काळात गुगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रणालींची अंमलबजावणी केली आहे. आता गुगलकडून आणखीन एक नवीन प्रणाली लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता गुगल भारतात अँड्रॉइड उपकरणांमध्ये भूकंपाची सूचना देणारी प्रणाली लॉन्च करणार आहे. या नव्या प्रणालीमुळे भूकंपाच्या सूचना थेट मोबाईलवर मिळणार आहेत. या नवीन प्रणालीच्या माध्यमातून लोकांना लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे अलर्ट देण्यात येतील. ज्यामुळे त्या परिसरातील लोकांना त्वरित सावधगिरी बाळगण्यास मदत होईल.

बुधवारी गुगल कंपनीने यासंदर्भातील माहिती देताना सांगितले आहे की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NSC) यांच्या सल्ला सहमतीने ही नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीचा Android वापरकर्त्यांवर नक्कीच प्रभाव पडेल. नवीन प्रणालीच्या माध्यमातून अँड्रॉइड वापरकर्त्यांना भूकंपाचे अलर्ट स्थानिक भारतीय भाषांमध्ये देण्यात येतील. यामुळे त्यांना भूकंपासंबंधित माहिती समजणे सोपे जाईल.

नवीन प्रणालीच्या माध्यमातून गुगल अँड्रॉइड वापरकर्त्यांना दोन प्रकारचे अलर्ट पाठवेल. ज्यामध्ये, बी अवेअर आणि टेक अॅक्शन अशा दोन प्रकारांचा समावेश असेल. अधिक तीव्रतेच्या भूकंपाच्या वेळी Google “जागरूक राहा” असा अलर्ट पाठवले. वापरकर्त्यांना फक्त या अलर्टची नोटिफिकेशन पडेल. परंतु जर तुमचा फोन डू नॉट डिस्टर्ब मोडवर किंवा सायलेंट मोडवर असेल तर कोणताही आवाज होणार नाही. त्याचबरोबर, 4.5 तीव्रतेच्या भूकंपाच्या वेळी वापर करताना तातडीने अलर्ट केले जाईल. यावेळी फोन सायलेंट असला तरी त्याचा मोठा आवाज होईल. ज्यामुळे लोकांना तातडीने सावधगिरी बाळगता येईल.

Google ने म्हटले आहे की, नविन प्रणाली एखाद्या भागात भूकंपाची क्रिया लक्षात घेऊन Android फोनद्वारे संभाव्य भूकंप कंपने शोधण्याचे काम करते. कंपनीचा दावा आहे की, ही प्रणाली तातडीने लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन करेल. तसेच अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने काय कृती करायला हवी याच्या देखील सूचना देईल. परंतु यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर काही सेटिंग्ज सक्षम करणे आवश्यक असेल. तसेच त्यांच्याकडे Wi-Fi किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी असावी. या माध्यमातून त्यांना त्वरीत भूकंपा संबंधित अलर्ट देण्यात येतील ज्यामुळे ते सतर्कता बाळगतील.