… तर जितेंद्र जितुद्दीन, शरद पवार हे समशुद्दीन आणि अजित पवार अजरुद्दीन झाले असते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर टीका करताना शरद पवार आणि अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्र जितुद्दीन, शरद पवार हे समशुद्दीन आणि अजित पवार हे अजरुद्दीन झाले असते अशी जहरी टीका त्यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून नेहमीच शरद पवार बोलत आहेत. जे त्यांना बोलता येत नाही ते जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून ते बोलत आहेत. पण जितेंद्र आव्हाडांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी गरळ ओकण्याचे काम जितेंद्र आव्हाड करताय. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर हे आव्हाड जितुद्दीन झाले असते, अजित पवार हे अजरुद्दीन आणि शरद पवार हे समशुद्दीन झाले असते, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. लोकांच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वातावरण निर्माण करणं, महापुरुषांबद्दल वारंवार चुकीची विधान करणे हे सर्व राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून राज्यातील जनता या लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले –

एका जाहीर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, एमपीएससीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढण्यात आला आहे. इतिहासातून औरंगजेब, अफझलखान, शाहिस्तेखान यांनाच काढून टाकले, तर शिवरायांचा इतिहास काय सांगणार? असा सवाल करत मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यावरून राज्यातील भाजप आक्रमक झाली आहे.