7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी (7th Pay Commission) वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा दिला जातो. याबाबतच आज शासन आदेश काढण्यात आला आहे. यात १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे हा महागाई भत्ता शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सर्वांना मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता दिला जाईल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात दुपटीने वाढ झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतरच राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (7th Pay Commission) वाढ केली आहे.

आतापर्यंत महागाई भत्त्यात झालेली वाढ (7th Pay Commission)

दरम्यान, यापूर्वी १ जानेवारी २०२३ रोजी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. तेव्हा ४२ टक्के महागाई भत्ता देण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये हा महागाई भत्ता पुन्हा वाढवण्यात आला नाही. पुढे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला. तेव्हा महागाई भत्ता ४२ वरून ४६ टक्के करण्यात आला होता. आता सरकारने पुन्हा एकदा या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. हा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आला आहे.