हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण लहानपणापासूनच टीव्हीवर बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स यांच्या जाहिराती पाहत मोठे झालेलो आहोत बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स पिल्याने मुलं लवकर मोठी होतात. त्यांची उंची वाढते आणि त्यांच्या शरीरात ताकद देखील येते. या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्यामुळे अगदी खेड्यापासून ते शहरापर्यंत सगळ्यांनाच या बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्सची ओळख आहे. आपल्या मुलांनी हॉर्लिक्स पिऊन मोठे व्हावे असे अनेक आई-वडिलांना वाटते. कंपन्यांनाही याचा खूप फायदा होता. परंतु आता केंद्र सरकारने या बॉर्नव्हिटाबद्दल एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे उत्पादन चांगले मानले जाणार नाही. असे त्यांनी सांगितलेले आहे.
ई-कॉमर्स आणि बिझनेस मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स वेबसाईटला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील हेल्ड रिंगच्या श्रेणीतून पेय आणि शीतपेय काढून टाकण्यास सांगितलेले आहे. यामध्ये बॉर्नव्हिटा आणि इतर काही उत्पादकांचा देखील समावेश आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे की, कोणतेही आरोग्य पेय हे परिभाषित केलेले नाही.
NCPR द कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स कायदा 2005 च्या कलम 3 अंतर्गत ही स्थापना केलेली आहे. एक वैधानिक संस्था असे निर्धारित केले आहे की, कोणतेही आरोग्य पेय हे अंतर्गत परिभाषित केलेले नाही. 2006 मध्ये लागू केलेल्या या नियमांमध्ये आणि नियमक मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे.
भारतातील अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकारण यांनी या महिन्याच्या सुरुवातीच्या ई-कॉमर्स वेबसाईटला हेल्थ रिस्क किंवा एनर्जी ड्रिंक्सचे शैलीतील डेअरी, धान्य किंवा मार्ट आधारित पेय उत्पादनांची यादी न करण्यास सांगितलेले होते. एनर्जी ड्रिंक हे कायद्यानुसार फक्त चवदार पाणी आहे. याशिवाय ते ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता सरकारने वेबसाईटला सगळ्या जाहिराती काढून टाकण्यास त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सांगितलेले आहे.