आता समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनसाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांकडून गोव्यास हजेरी लावली जाते. समुद्रकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय करत हातात मद्याचा प्याला असे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, पर्यटकांच्या हुल्लडबाजीत व दारू पिल्यानंतर टाकलेल्या बाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. पर्यटनस्थळ सुरक्षित व स्वच्छ राहण्याच्या अनुषंगाने आता तेथील सरकारने कठोर पावले उचलली आहेत. येथील सरकारने समुद्रकिनारी बसून दारू पिण्यास बंदी केली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यास 5 ते 50 हजाराचा आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे.

गोवा सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. किनाऱ्यांवर कचरा फेकल्यास आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. या शिवाय किनाऱ्यावर गाडी चालवणं आणि दारू पिण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

गोवा सरकारने गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील मालवण आणि कर्नाटकातील कारवारमधील वॉटर स्पोर्ट्सच्या अवैध तिकीट विक्रीवरही बंदी घातली आहे. अनधिकृतपणे तिकिट विक्री करण्याऱ्यांवरही सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायदा, 2001 च्या कलम 3 अंतर्गत हे निर्देश देण्यात आले आहेत.