पॉपकॉर्नच्या किंमतीत मोठी वाढ; सरकारने लावला GST

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक पॉपकॉर्न प्रेमी आहेत , त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. सरकारने राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडलेल्या 55 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर विविध जीएसटी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पॉपकॉर्न प्रेमींसाठी पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार आहेत , म्हणजेच आता त्यांच्या खिशाला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पॉपकॉर्नच्या विक्रीवर आधारित कर लागू करण्याचे ठरवण्यात आले असून , कोणत्या पॉपकॉर्नवर किती कर आकारला जाणार आहे , हे आज आपण पाहणार आहोत . तर चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात .

पॉपकॉर्नचे प्रकार आणि GST दर –

जीएसटी परिषदेने पॉपकॉर्नचे प्रकार आणि विक्रीच्या पद्धतीनुसार वेगवेगळे कर लागू केले आहेत. त्यामध्ये मीठ व मसाल्यासह विना-लेबल विक्री होणाऱ्या पॉपकॉर्नवर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे. म्हणजेच 100 रुपयांच्या पॉपकॉर्नसाठी आता 105 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच लेबल लावून विक्री होणाऱ्या पॉपकॉर्नवर 12% जीएसटी आकारण्यात येणार आहे . त्यामुळे 100 रुपयांचे पॉपकॉर्न 112 रुपयांना मिळतील. त्याचबरोबर साखर मिसळून तयार केलेल्या कॅरॅमल पॉपकॉर्नला मिठाई प्रकारात गणले गेले असून, त्यावर 18% जीएसटी लावला जाणार आहे. त्यामुळे 100 रुपयांचे कॅरॅमल पॉपकॉर्नवर 118 रुपये मोजावे लागणार आहेत.

आर्थिक फटका सहन करावा लागणार –

पॉपकॉर्नवरील जीएसटी वाढीच्या दरामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता सिनेमागृह, प्रवास किंवा इतर ठिकाणी पॉपकॉर्न खाणारे लोक चिंतेत पडले आहेत . या दर वाढीमुळे येत्या काळात त्याचा काय परिमाण होईल हे लवकरच समोर येईल. त्यामुळे आत पॉपकॉर्न खाताना लोकांना जीएसटीचा विचार करून ते खरेदी करावे लागतील .