हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना आणि विविध सोयी सुविधा राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग (Department of Agriculture) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकाचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून पीक उत्पादन करावे यासाठीच कृषी विभागाने पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून शेतकऱ्यांना 50 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.
राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. तसेच राज्यात शेती संदर्भात विविध प्रयोग राबवले जावे हा उद्देश ठेवून अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत अर्ज करावा लागेल. ही स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित केली जाईल.
या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण शेतकरी आदिवासी गटातील शेतकरी देखील भाग घेऊ शकतात. यामध्ये मूग, उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग, व सुर्यफूल अशा पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी काय पात्रता हवी? याविषयी जाणून घ्या.
शेतकऱ्यांची पात्रता काय हवी??
- शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच त्या जमिनीवर स्वतः कसत करणे आवश्यक आहे.
- एकापेक्षा अधिक पिकांसाठी शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येईल.
- स्पर्धेत भाग घेताना सर्वसाधारण शेतकऱ्याला 300 रुपये तर आदिवासी शेतकऱ्याला 150 रुपये भरावे लागतील.
- इच्छुक शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर हवे. तर इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड हवी.
- अर्ज सादर करताना विहित नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा व ८-अ चा उतारा द्यावा लागेल.
- आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्रात द्यावे लागेल.
- चिन्हांकीत नकाशा, बँक खाते, चेक, किंवा पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत ही द्यावी लागेल.