Government Jobs after JEE Exam | JEE नंतर अधिकारी पदावर मिळणार सरकारी नोकरी!! जाणून घ्या प्रक्रिया

Government Jobs after JEE Exam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Jobs after JEE Exam | तुम्हाला जर आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जेईई परीक्षा उत्तीर्ण करणे खूप गरजेचे आहे. ही परीक्षा तुमच्यासाठी सरकारी नोकरीचे दार उघडते. परंतु जर तुम्हाला या परीक्षेत चांगले गुण असतील, तर तुम्ही थेट अधिकारी होऊ शकता. आता आपण जेईई परीक्षेमुळे तुम्ही सरकारी नोकरी कशी मिळवू शकता हे पाहणार आहोत.

तुम्ही जर जेईई (Government Jobs after JEE Exam) ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुम्हाला जर आयआयटीमध्ये प्रवेश घेताना असेल, तर तुम्ही भारतीय सैन्यात तांत्रिक प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमची जेईईमध्ये निवड झाली, तर तुम्हाला अधिकारी पदावर नोकरी मिळू शकते. भारतीय नौदलाने या परीक्षेसाठी त्यांच्या वेबसाईटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. या भरतीत जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला चांगला पगार देखील मिळतो.

शैक्षणिक पात्रता | Government Jobs after JEE Exam

या परीक्षेत बसण्यासाठी तुम्हाला 70 टक्के गुणांसह बारावी पास असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेईई मेन परीक्षेला बसणे आवश्यक आहे. दोन्ही गुणपत्रिकेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवाराची बारावी ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये असावी. या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

वयोमर्यादा

तुमचे वय जर 20 वर्षे असेल, तर तुम्ही या भरती मोहिमेत भाग येऊ शकता. कारण या परीक्षेसाठी कमाल वय 19.5 निश्चित करण्यात आलेले आहे. 16.5 ते 19.5 या वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याची मुलाखत घेतली जाईल. आणि मुलाखतीवर निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय नौदलात कडून मेल पाठवला जाईल

नवोदयातून मिळणार मोफत शिक्षण

या निवडलेल्या उमेदवारांना अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजीनियरिंगमधील चार वर्षाच्या B. Tech कोर्ससाठी कॅडेट म्हणून समाविष्ट केले जाईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ द्वारे दिली जाईल. त्याचप्रमाणे मुलाखत पूर्ण झाल्यानंतर पुस्तके, वाचन, साहित्य, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च हा भारतीय नवोदयाकडून केला जातो. त्याचप्रमाणे कॅडेट्सला योग्य कपडे आणि जेवणही दिले जाते.