हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. महिलांचा आर्थिक दृष्ट्या आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अनेक योजना राबवल्या जातात अशातच आता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांना रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेचे नाव पिंक इ रिक्षा असे आहे. या योजनेअंतर्गत विशेषतः दारिद्र रेषेखालील महिला, विधवा महिला आणि घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सरकार या योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये महिलांना केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 20 टक्के रक्कम आर्थिक सहाय्य राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. आणि उरलेले 70% हे बँकामार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी अनेक बँकांसोबत सरकारने करार देखील केलेली आहे. मुख्यमंत्री राजकीय बहिणी योजनेच्या अधिवेशनात सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे. आणि तिची सध्या राज्यभर चर्चा देखील चालू झालेली आहे.
राज्यातील सर्व पात्र महिला या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सरकारने ही पिंक इ रिक्षा योजना चालू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि संरक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्याकडून आव्हान देखील करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि इतर महिलांना रोजगारांची संधी देखील उपलब्ध व्हावी. या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. .महिलांच्या आर्थिक स्तरात सुधारणा व्हावी आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने त्यांना आणखी एक पाऊल टाकता यावे, यासाठी ही योजना चालू केलेली आहे.
योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महिलेचे वय हे 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांच्या आत असावे.
- लाभार्थी महिन्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
- दारिद्र रेषेखालील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- डोमासाईल सर्टिफिकेट
- शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- बँक खाते पुस्तक