Government Saving Schemes Rules | सरकारी बचत योजनांबाबत ‘ही’ कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करा, नाहीतर भरावा लागेल दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Saving Schemes Rules | दरवर्षीचा आपण आपल्या भविष्यातील गोष्टींसाठी आर्थिक नियोजन करत असतो. दरवर्षी काही ना काही बचत करत असतो. सध्या सरकारकडून देखील अनेक आर्थिक गुंतवणुकीच्या योजना आल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतात. आणि दरवर्षी आर्थिक योजनांमध्ये मोठमोठे बदल देखील होत असतात. या वर्षी देखील अनेक लहान योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे.

ते म्हणजे यावर्षी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, आणि NPS मध्ये गुंतवणूकदारांना दंडासह मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या योजनांपैकी कोणत्याही योजनांमध्ये जर तुमचे खाते असेल, तर 31 मार्च पर्यंत तुम्हाला तुमची सगळी बँकेची कामे करून घ्यायची आहे.

या आर्थिक वर्षात जर तुम्ही अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा केले नसतील. तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमचे हे खाते पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला 31 मार्चपर्यंत वेळ आहे. तुम्ही जर वार्षिक ठेव ठेवली तर तुमचे खाते कायमचे दंड होऊ बंद होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक दंड देखील भरावा लागू शकतो.

NPS , पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना या योजनांमध्ये किमान ठेवण्याची अंतिम तारीख ही प्रत्येक वर्षाची 31 मार्च अशी आहे. आता 2023 आणि 24 चा आर्थिक वर्षासाठी ही तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यामुळे प्रत्येक खातेधारकांनी प्रत्येक वर्षात खात्यात कमीत कमी 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ते 500 रुपये जमा केले नाही तर तुमचे खाते कायमचे बंद होऊ शकते.

जर तुमचे खाते बंद झाले तर तुम्हाला कर्ज काढण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार नाही. आणि हे खाते पूर्णपणे बंद पडले तर तुमच्या नावावर दुसरे खाते देखील उघडू शकणार नाही. तुमचेच हे पीपीएफ खाते बंद केले असेल तर तुम्हाला ते परत उघडता येते. पण त्यासाठी तुम्हाला 50 रुपये दरवर्षी दंड भरावा लागतो. तसेच या दंडासोबत व्यक्तीला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागते जरी ठेवली नाही तर तुम्हाला दरवर्षी 550 रुपये भरावे लागतात.

सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी आणि महिलांसाठीची योजना आहे. मुलींच्या करिअरसाठी आणि त्यांच्या लग्नासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी ही योजना अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. जर तुमचे या योजनेमध्ये खाते असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावे लागतात जर तुम्ही हे पैसे जमा केले नाही. तर तुमचे खाते बंद केले जाते आणि हे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला वर्षाला 50 रुपये दंड भरावा लागतो.

तुम्ही आर्थिक वर्ष 2023 मध्ये जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरण्याचा विचार करत असाल, तर पीपीएफ आणि सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुम्हाला संधी मिळते. या गुंतवणुकीवर तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे. त्यामुळे 31 मार्च 2019 तुमचे वार्षिक पैसे भरले नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.