हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य कसे असेल? याचे नियोजन आपण आताच करणे गरजचे आहे. कारण, निवृत्तीनंतर आपले उत्पन्न थांबते. पण, दैनंदिन खर्च मात्र आहेत तसेच राहतात. अशावेणी आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करून गुंतवणुकीच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यातील बऱ्याच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. ज्येष्ठांसाठी फायदेशीर ठरेल असा एका सरकारी योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) असे आहे. ज्यात गुंतवणूक केल्यास म्हतारपणी आर्थिक संकटांना हसत हसत तोंड देता येईल. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक सरकारी योजना आहे. (Government Scheme) ज्यामध्ये एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर तुम्हाला दर तिमाहीत २० हजार ५०० रुपये किंवा वार्षिक स्वरूपात ८२ हजार रुपये कमवता येतात. माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते. जी एक छोटी बचत आणि हमी परतावा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक स्वरूपात ८.२०% व्याज दिले जाते.
कालावधी (Government Scheme)
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या नॉन-मार्केट-लिंक्ड प्लॅनमध्ये एकूण ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. यामध्ये गुंतवणूकदारास एकरकमी गुंतवणूक केल्याने व्याजाच्या स्वरूपात तिमाही उत्पन्न मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यास किमान ठेव रक्कम १ हजार आणि त्याच्या पटीत कारवी लागते. तर या योजनेतील कमाल ठेव ही ३० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
(Government Scheme) या योजनेत गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा सांगायचा झाला तर, गुंतवणूकदारास वर्षभरात १.५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर आयकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. मात्र, एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज ५० हजारापेक्षा जास्त असेल तर ते करपात्र आहे. त्यामुळे एकूण भरलेल्या व्याजातून विहित दराने TDS कापला जातो.
SCSS मध्ये कोण खाते उघडू शकतं?
ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS योजनेत कोणतीही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. तसेच ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त नागरी कर्मचारीदेखील या योजनेचा भाग होऊ शकतात. (Government Scheme) याशिवाय ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारीदेखील SCSS योजनेचे खाते उघडू शकतात.
वार्षिक उत्पन्न कसे मिळवाल?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना वार्षिक उत्पन्नासाठी १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून त्यांना तिमाही २० हजार ५०० रुपये व्याज मिळेल. तर चार तिमाहीत ही रक्कम ८२ हजार रुपये इतके होईल. योजनेच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळेल.
(Government Scheme) माहितीनुसार, एखादा गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत सर्वाधिक ३० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या रकमेवर गुंतवणूकदारांना ६१ हजार ५०० रुपये इतके त्रैमासिक व्याज मिळेल. तर चार तिमाहीत ही रकम १२ लाख ३० हजार रुपये इतकी होईल. योजनेच्या मॅच्युरिटीनंतर यातून गुंतवणूकदारांना मूळ रक्कम परत मिळेल.