हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Investment) सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याआधी सुरक्षिततेची हमी हवी असते. जी सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती सरकारी योजनांना असते. या सरकारी योजनांपैकी मुदत ठेव अर्थात FD आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSC या योजना सामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण या दोन्ही सरकारी गुंतवणूक योजना जोखीममुक्त, सुरक्षित आणि चांगला परतावा देतात. मात्र आज आपण एका अशा योजनेविषयी जाणून घेणार आहोत, जी या दोन्ही योजनांपेक्षा जास्त जोखीममुक्त परतावा देऊ शकते.
(Government Schemes For Investment) FD आणि NSC या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास एका निश्चित कालावधीनंतर किती परतावा मिळणार? हे गुंतवणूकदारांना माहीत असते. तथापि, सरकारची आणखी एक योजना आहे. जी सुरक्षित आहे आणि FD, NSC पेक्षा जास्त परतावा देते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल FD आणि NSC पेक्षा जास्त परतावा देणारी योजना कोणती? तर याच उत्तर आहे RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स. होय. ही सरकारी योजना FD आणि NSC पेक्षा जास्त जोखीममुक्त परतावा देते.
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स (Government Schemes For Investment)
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स ही एक सरकारी योजना आहे. जी समर्थित बचत साधनांपैकी एक असून भारतीय गुंतवणूकदारांना स्पर्धात्मक व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूक देणारी आहे. आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्सवरील व्याजदर हा फिक्स्ड रेट बॉण्ड्सच्या विपरीत त्याच्या परिपक्वतेचा कालावधीवर निश्चित केला जात नाही. तर या योजनेचा व्याजदर हा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC योजनेच्या प्रचलित व्याज दराशी ३५ बेस पॉइंट (bps) स्प्रेडसह जोडलेला असतो.
कोण गुंतवणूक करू शकतो?
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड या सरकारी योजनेत कोणताही भारतीय नागरिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबे गुंतवणूक करू शकतात. (Government Schemes For Investment) तसेच आई- वडील त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या वतीनेदेखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ही योजना केवळ भारतीय नागरिक संयुक्त होल्डिंग्स सहित असतील त्यांच्यासाठी लागू आहे. त्यामुळे अनिवासी भारतीय RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
किती गुंतवणूक करता येते?
सरकारच्या RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १००० रुपये किंवा त्याच्या पटीत अधिक गुंतवणूक करता येते. या बाँडमधील गुंतवणुकीवर कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.
व्याजदर
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड या योजनेंतर्गत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC च्या दरापेक्षा ०.३५% अधिक व्याज मिळते. (Government Schemes For Investment) हा व्याजदर दर ६ महिन्यांनी सुधारित केला जातो. त्यामुळे दर ६ महिन्यांनी व्याजदर बदलतो ज्याचा फायदा थेट गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळण्यासाठी होतो.
परिपक्वता कालावधी
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड या योजनेच्या परिपक्वतेचा म्हजनेच मॅच्युरिटीचा कालावधी हा एकूण ७ वर्षे इतका आहे. दरम्यान RBI च्या नियमानुसार, ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटातील गुंतवणूकदार मॅच्युरिटी कालावधीआधी पैसे काढू शकतात. कारण ६० ते ७० वय वर्षे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लॉक-इन कालावधी हा ६ वर्षे इतका आहे. (Government Schemes For Investment)
तसेच त्यापुढील ७० ते ८० वय वर्षे असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लॉक इन कालावधी ५ वर्षे इतका आहे. तर ८० वर्षे आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लॉक इन कालावधी हा ४ वर्षे इतका आहे.