Government Schemes For Women | महिलांच्या विकासासाठी सरकारने सुरु केल्यात ‘या’ योजना, आजच घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Schemes For Women | आपले सरकार हे नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना आणत असतात. त्यातही महिलांसाठी खूप योजना आणत असतात. महिलांच्या सबलीकरणासाठी त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे. यासाठी अधिक नवीन उपक्रम आणलेले आहेत. 8 मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेमधून महिलांनाअर्थसहाय्य, आरोग्य, कौशल्य विकास यांसारख्या गोष्टीबद्दल माहिती दिली जाते. आता सरकारने महिलांसाठी कोणकोणत्या योजना आणलेल्या आहेत याची आपण सविस्तर माहिती पाहूयात.

बेटी बचाव बेटी पढाओ

समाजातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर साधारण समान व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. मुली देखील मुलांप्रमाणे महत्वाच्या आहेत. हा संदेश देण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. मुलींना देखील शिक्षणाचा हक्क मिळावा त्यांनी देखील शिकून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी ही योजना (Government Schemes For Women) काढलेली आहे.

स्टँड अप इंडिया

या योजनेत अंतर्गत महिलांना उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा नवीन बिजनेस सुरू करण्यासाठी त्यांना सरकारकडून कर्ज मिळते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी सरकारचा हा नवीन प्रोजेक्ट आहे.

स्किल इंडिया मिशन | Government Schemes For Women

इंअनुरूप कौशल्याचे प्रशिक्षण महिलांना याद्वारे देते जाते. त्यामुळे जॉब मार्केटमध्ये जॉब करण्यासाठी त्या सक्षम होतात आणि त्यांच्याकडे नवीन स्किल्स येतात.

वन स्टॉप सेंटर

हिंसाग्रस्त महिलांना वैद्यकीय, आरोग्य तसेच कायद्याची समुपदेशनाची सर्व माहिती या ठिकाणी मिळते.

महिला हेल्पलाइन

अडचणीत असलेल्या महिलांना 181 या हेल्पलाइनवर संपर्क करून त्यांना कधीही मदतीसाठी हात दिला जातो. हे या योजनेचे खरे उद्दिष्ट आहे

महिला पोलीस स्वयंसेवक

हे स्वयंसेवक महिलांच्या सुरक्षितेसाठी असतात. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी या महिला काम करत असतात.

सुकन्या समृद्धी योजना

या योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना मुलींच्या नावे सरकारकडून मानधन मिळते. आणि चांगला व्याजदर देखील मिळतो. याचे अनेक फायदे होत असतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

छोट्या उद्योग करणाऱ्या महिलांना या योजनेद्वारे सहाय्य मिळते. (Government Schemes For Women)त्यातून त्यांना हा व्यवसाय मोठा करता येतो.