हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार सामान्य जनतेसाठी विविध निर्णय घेत असतात. अशातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता सरकारने बिगर बासमती असणाऱ्या पांढऱ्या पांढऱ्या तांदळाच्या निर्यात शुळकावरील संपूर्णपणे बंदी उठवली आहे. त्याचबरोबर प्रतिटन 490 डॉलर किमान निर्यात शुल्क देखील निश्चित केलेले आहे. सरकारने जुलै 2023 मध्ये तांदळाचा देशांतर्गत पुरवठा निश्चित करण्यासाठी आणि या तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही बंदी घातली होती. परंतु नुकतेच त्यांनी ही बंदी उठवलेली आहे.
या निर्णयाबाबत परकीय व्यापार महासंचालनाने म्हटले आहे की, “देशातील सरकारी गोदामामध्ये तांदळाचा पुरेसा साठा असताना आणि किमतीमध्ये नियंत्रणात असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने पांढऱ्या तांदळावरील शुल्क 10 टक्के कमी करताना बिगर बासमती पांढऱ्या तांदळाला सिर्यात शुल्कातून सुट दिलेली आहे.”
याबाबत राईस व्हीलाचे सीईओ सुरज अग्रवाल यांनी मत व्यक्त केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “बासमती नसलेल्या पांढऱ्या तांदळाच्या निर्यात वरील निबंध उठवण्याचा भारताचा धाडसी निर्णय हा कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या धोरणात्मक हालचालीमुळे केवळ निर्यातीदारांच्या उत्पादनाला चालना मिळणार नाही. तर नवीन खरीप पिकाच्या येऊ घातलेल्या आगमनाने जास्त परताव्याची अपेक्षा करणारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण देखील होणार आहे.”सरकारने तांदळावरील निर्यात शुल्क हे 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहे. अनेक लोक हे या तांदळावरील बंदी हटवण्याची मागणी करत होते. आता सरकारने तो निर्णय घेतल्यामुळे अनेक जण या निर्णयाचे कौतुक करत आहे.