हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एका खास विमा योजनेची (Student Scheme) घोषणा केली आहे. ही योजना शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला वैद्यकीय आणि अपघाती विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विम्याचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरू असेल. या योजनेसंदर्भात 16 ऑक्टोंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, ही योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.
विम्याविषयी माहिती
सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेसाठी (Government Scheme) 20 रुपये प्रीमिमय भरावे लागेल. त्यानंतर एका विद्यार्थ्याला 1 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण देण्यात येईल. ही पॉलिसी फक्त एका वर्षासाठी लागू असेल. मात्र, 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीमध्ये 5 लाख रुपयांचे कव्हरेज देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्याला अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाखांपर्यंत मेडिकल कव्हरेज हवे असल्यास त्याला 422 रुपये प्रीमियम भरावे लागेल. मुख्य म्हणजे, या विम्याचा सेकंडरी विमा सदस्य हा शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल. ज्यामुळे या विम्याचा लाभ विद्यार्थ्यांच्या पालकाला देखील घेता येईल.
समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारने या योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यानुसार, ICICI Lombard मध्ये 20 रुपये आणि 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना असणार आहेत. तर नॅचरल इन्शुरन्समध्ये 62 रू प्रीमियमचा 5 लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा मिळणार आहे. त्यामुळे या विम्याचा मोठा फायदा शाळकरी आणि पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.