बाप्पा पावला रे!! कोकणात जाणाऱ्यांना सरकारची टोलमाफी; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सगळीकडे गणेशत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम असून कोकणात तर हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मुंबई- पुणे येथील कोकणी चाकरणामी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी घरी जातो. अशाच गणेशभक्तांसाठी राज्यातील शिंदे सरकारने (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशी वाहणांना टोल माफी (Free Toll) देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा खर्च वाचणार आहे.

टोलमाफिसह इतर सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार 16 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबर पर्यंत ही सवलत ह्या महामार्गवरील प्रवासात लागू असेल.

असा घेऊ शकता लाभ 

शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांना आरटीओ कार्यालयात जाऊन ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास घेणे आवश्यक आहे. संबंधित पास व स्टिकर्स आपल्या वाहनावर चिटकवणे आवश्यक असेल. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहावा. स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार वाहतूक पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग , पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या येथून मिळतील. परतीच्या प्रवासात देखील हाच पास ग्राह्य धरला जाईल असे सांगण्यात आले आहे.