Gpay Phonepe Coupons | Phonepe, Gpay वरील कुपन विकून कमवा पैसे; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून माणूस देखील आता प्रगतीच्या मार्गावर चाललेला दिसत आहेत. मोदी सरकारने कॅशलेस इंडिया बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतातील जवळपास सगळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागले आहेत. सध्या ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत. अनेक लोक हे ऑनलाईन ॲप वापरून पेमेंट करत असतात. अनेकांच्या मोबाईलमध्ये Gpay तसेच फोन पे (Gpay, Phonepe Coupons) यांसारखे ॲप असतात. आपण कोणतेही दुकानात गेलो तरी या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करत असतो. अगदी मोठ्या बाजारात गेलो काय किंवा साधी कोथिंबीर घ्यायला गेलो तरी, आजकाल सगळीकडे गुगल पे किंवा फोन पेचा स्कॅनर उपलब्ध असतो.

हे ॲप जेव्हा आपण वापरतो, तेव्हा कोणतंही ट्रांजेक्शन केलं की, सुरुवातीला आपल्याला कॅशबॅक मिळत होता. परंतु आजकाल हे कॅशबॅक कधीतरीच मिळतो. त्या ऐवजी कूपन मिळतात. ज्याचा वापर लोक करत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का? google पे किंवा फोन पेने दिलेल्या या कूपनचा वापर करून देखील तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता,

G pay आणि फोन पेवर जेव्हा आपण ट्रांजेक्शन करतो. तेव्हा आपल्याला खूप कूपन येतात. परंतु त्या कुपनकडे आपण बघत देखील नाही. त्यातील काही कुपन अशी असतात, जी आपल्या काहीच कामाची नसतात. मग ती तशीच राहतात. परंतु आता तुम्ही वापरत नसलेल्या या कुपनचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण की हीच कुपन तुम्हाला पैसे मिळवून देणार आहेत.

कुपन विकून मिळवा पैसे | Gpay, Phonepe Coupons

तुम्हाला जर या कूपनमधून पैसे कमवायचे असेल, तर तुम्हाला ते खूपच विकावे लागेल. यासाठी अशा वेबसाईट आहे. जिथे तुम्ही हे कुपन विकू शकता. आणि बदल्यात पैसे घेऊ शकता. परंतु तरी देखील सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, ही कुपन नक्की विकायची कुठे? आणि त्याचा फायदा कसा होणार? तर याचीच माहिती आपण घेऊया.

कुपन विकायचे कुठे?

Cansell आणि zingoy या दोन अशा वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर तुम्ही हे कुपन विकू शकता आणि पैसे कमवू शकता. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी लॉगिन करायचे आहे. नंतर तुमच्या कूपनची सविस्तर माहितीच्या वेबसाईटवर टाकायची आहे. ज्याला हव तो इथून तुमच्या कुपन विकत घेईल. त्याबद्दलचा कॅशबॅक तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर हे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. अशाप्रकारे आजपर्यंत तुम्ही ज्या कुपनकडे कधी पाहिले देखील नाही त्या कूपनचा वापर करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.