गोंदिया हादरलं! पूर्व वैमनस्यातून ग्रामपंचायत परिचराची निर्घृणपणे हत्या, आरोपीचे आत्मसमर्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून गावातील ग्रामपंचायत परिचराची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. हि धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव यशवंत मेंढे असे आहे.

काय घडले नेमके?
मृत यशवंत मेंढे हे आज आपलं काम आटोपून घरी जात होते. या दरम्यान ग्रामपंचायत गेटसमोर 38 वर्षीय आरोपी प्रवीण नेवारे याने आपली टाटा सुमो गाडीने यशवंत मेंढे यांना जोराची धडक (Murder) दिली. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने गाडी पुन्हा मागेपुढे करत मेंढे यांना गाडीखालून अक्षरश: चिरडले(Murder). यानंतर आरोपी घटनास्थवरून पळून गेला.

यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने यशवंत यांना उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. त्या ठिकाणी उपचारदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू (Murder) झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी कलम 307, 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या हत्येनंतर (Murder) आरोपी प्रवीण नेवारे याने हत्या केल्यानंतर दवणीवडा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय