ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदासाठी 84 तर सदस्य पदासाठी 432 अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मोठी गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी गुरूवारी दि.1 डिसेंबर रोजी 241 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 12 ग्रामपंचायतींसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण सरपंच पदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 432 अर्ज दाखल झाले आहेत.

कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सात डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. गुरूवारी चौथ्या दिवशी सरपंचपदासाठी हणुमानवाडी, वनवासमाची (खोडशी), चोरजवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, साबळवाडी, आरेवाडी, मनु, पश्चिम सुपने, येळगाव, आटके आणि तळबीड ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी 1, दुशेरे, अंतवडी, शामगाव, रेठरे खुर्द, जुळेवाडी, कासारशिंरबे, सुपने, चरेगावसाठी प्रत्येकी 2, ‘कळंत्रेवाडीसाठी 3 आणि पाडळीसाठी (हेळगाव) 4 असे 35 अर्ज दाखल झाले.

सदस्यपदांसाठी वनवासमाची (खोडशी), हिंगनोळे आणि गणेशवाडीसाठी प्रत्येकी 2 ओंडोशी, साबळवाडीसाठी प्रत्येकी 3, दुशेरे, गोंदी, कोरेगाव आणि किवळसाठी प्रत्येकी 4, चोरजवाडी, हणमंतवाडी, अंतवडी, आरेवाडी, येळगावसाठी प्रत्येकी 5, घराळवाडी, आणेसाठी प्रत्येकी 6, हणुमानवाडी, शामगाव, कळंत्रेवाडी, मनु आणि जुळेवाडीसाठी प्रत्येकी 7, अंधारवाडी, सुपनेसाठी प्रत्येकी 7, चरेगावसाठी 12, पाडळीसाठी (हेळगाव) 13, पश्चिम सुपने आणि आटकेसाठी प्रत्येकी 14, कासारशिरंबेसाठी 15, कालगाव, तळबीडसाठी 16, रेठरे बुद्रुकसाठी 19 अर्ज आज दाखल झाले.