व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. राज्यातील महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती या निवडणुक निकालामुळं चर्चेत आल्या आहेत. यांपैकी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हेही चर्चेत आले असून त्यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसेच नुसत्या विजयी झाल्या नसून त्या सरपंचही बनल्या आहेत.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी उमेदवारी आज दाखल केला होता. या ठिकाणी त्या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांकडून ही सरपंचपदाची निवडणूक लढवलेली नाही, तर अपक्ष म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला होता.

जावई असल्यामुळे पडला निवडणुकीत प्रभाव

महाराष्ट्रातील किर्तनाच्या क्षेत्रात नावाजलेलं नाव असलेले प्रसिद्ध निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर हे शशिकला पवार यांचे जावई आहेत. त्यामुळे या गोष्टींचाही चांगला प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीवर दिसून आला आहे.