Gratuity Rule | कंपनीत 5 वर्षे पूर्ण केल्यास कर्मचाऱ्याला मिळतो ग्रॅच्युइटी निधी; वाचा सर्व नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Gratuity Rule प्रत्येक कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीत किमान पाच वर्षे काम पूर्ण केले. तर त्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून एक मोठी रक्कम दिली जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीने काही कारणाने मधेच नोकरीचा राजीनामा दिला. तरीही त्याला ग्रॅच्युइटीचा (Gratuity Rule) निधी मिळतो. आता यासंदर्भात अधिक कायदे आणि नियम लागू केलेले आहेत. तेच कायदे आणि नियम आज आपण जाणून घेणार आहोत.

यासंबंधित काही नियम आहेत ते जाणून घेऊयात | Gratuity Rule

ग्रॅज्युईटी कायदा 1972 मध्ये या संदर्भात सर्व तरतुदींचा समावेश केलेला आहे. या कायद्यानुसार जर एखाद्या कर्मचार्‍याने एखाद्या कंपनीत पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली, तरी देखील त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षे पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला आणि त्या व्यक्तीला ग्रॅचुईटी मिळाली नाही, तर तो व्यक्ती ग्रॅच्युईटीसाठी दावा करू शकतो. जर एखाद्या कंपनीत सहा वर्ष काम करण्याचा नियम असेल, तरी त्या एखाद्या व्यक्तीने जर 4 वर्षे 240 दिवस काम केले तरी त्या व्यक्तीला ग्रॅच्युइटी मिळते.

वकील आदित्य चोप्रा यांनी देखील ग्रॅच्युईटीच्या कायद्याच्या कलम 4(2) चे काही मुख्य मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये 4 वर्षे 6 महिने काम केले असेल, तर त्या कर्मचारी पेमेंटचा हक्कदार असेल. जर काही वेगळ्या स्थितीमध्ये म्हणजेच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, आजार किंवा अपघातामुळे अपंगत्व आले. तर त्या परिस्थितीत किमान वेळ पूर्ण करण्याची देखील अट लागू होत नाही.