हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या वाढत्या महागाईमुळे अनेक लोक घरच्या घरीच भाजीपाला पिकवण्यावर अधिक भर देत आहेत. यातील जास्तीत जास्त लोकांचा कल हा लसूण पिकवण्यावर आहे. लसूण (Garlic Plant) हा फक्त स्वयंपाकाची चव वाढवणारा पदार्थ तो आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे बाजारात याची विक्री जास्त होते. परिणामी याचा शेतकऱ्याला अधिक फायदा होतो. त्यामुळेच आज आपण लसूणची लागवड कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत.
सर्वात पहिल्यांदा लसूण लागवडीसाठी बाजारातून 10 ते 15 रुपयांत चांगल्या प्रतीच्या 8 ते 10 पाकळ्या खरेदी करा. जर तुमच्याकडे मोकळी जमीन नसेल, तर कुंडी, ग्रो बॅग किंवा जुन्या बादल्यांचा वापर करू शकता. लसूण लागवडीपूर्वी माती व्यवस्थित तयार करा. सेंद्रिय खत, गाईचे शेण, गांडूळ खत यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास लसूण अधिक चांगल्या प्रकारे वाढतो, त्यामुळे यांचा वापर करायला विसरू नका.
पुढे, लसणाच्या पाकळ्या 2 इंच खोल मातीत लावा. लक्षात ठेवा की, टोकदार भाग वरच्या दिशेने असावा. यानंतर रोज मातीत ओलावा राखा, परंतु पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी फवारल्यास चांगले परिणाम दिसून येतील. याशिवाय लसूण हा सूर्यप्रकाश येणाऱ्या भागामध्ये लावा. तसेच, 15 दिवसांनी जैविक खत टाकत चला. हे प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या लसणाची चांगली लागवड होईल.
घरच्या घरी लसूण उगवण्याचे फायदे
खरे तर, बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या लसणावर अनेकदा रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तो दीर्घकाळ टिकतो, परंतु त्यातील पोषणमूल्ये कमी होतात. घरी उगवलेला लसूण सेंद्रिय असल्याने त्यात कोणतेही हानिकारक पदार्थ नसतात. हा लसूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. 10 ते 15 रुपयांत लावलेल्या लसणाच्या पाकळ्यांपासून अनेक किलो लसूण मिळू शकतो, जो महिनाभर पुरतो. शिवाय, घरच्या लसणाची चव आणि सुगंध बाजारातील लसणापेक्षा अधिक ताजेतवाने असतो.