हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गुडीपाढव्या पासूनच मराठी माणूस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. गुढीपाढव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभारली जाते. आणि तिची पूजा अर्चा केली केली जाते. असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर आपल्याला सुख, यश आणि समृद्धी मिळते. यंदा 9 एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे. परंतु तुम्ही गुढी पाडवाचा अर्थ माहित आहे का? चला तर महाग जाणून घेऊयात
गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. असे म्हटले जाते की हा तोच दिवस आहे ज्यादिवशी ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. गुढी पाडवा शब्दातील गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज. तर पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या दिमाखात आणि उत्साहाने साजरा केला जातो. घरावर गुढी उभारल्याने (Gudi Padwa 2024) नकारात्मक शक्ती दूर होतात. जीवनात समृद्धी येते. सौभाग्य मिळतं, असं मानलं जातं.
गुढी पारंपारिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावर चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो. तसेच केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी ती सजवली आहे आणि त्यावर साडी नेसवली जाते. घराच्या बाहेर हि गुढी उभारून तिची पूजा केली जाते. सर्वजण नवीन कपडे परिधान करून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण त्याच्या ऐपतीनुसार गोड़धोड पदार्थ बनवून खात असतात.