हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gujarat Bridge Collapse । गुजरात मधून एक धक्कादायक घटना समोर येतेय. डोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल नदीत कोसळला. या पुलाचे २ तुकडे झाले. या दुर्घटनेत अनेक वाहने पाण्यात पडली. यामध्ये आत्तापर्यन्त ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. गंभीरा पूल बऱ्याच काळापासून वाईट स्थितीत होता असं बोललं जातंय. मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही पाऊले का उचलली नाहीत याचा शोध आता घेण्यात येईल.
गुजरात मधील हा पूल महिसागर नदीवर होता. अचानकच या पुलाचे २ तुकडे झाले (Gujarat Bridge Collapse) आणि पुलावर असलेले २ ट्रक नदीत कोसळले. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. २ ट्रक व्यतिरिक्त पुलावर उपस्थित असलेली ४-५ वाहने नदीत वाहून गेली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळेच हा पूल खचला असल्याचं बोललं जातेय. गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो.
Gambhira Bridge Crash on Mahisagar River in Gujarat. pic.twitter.com/acizYs8Lr0
— AnD (@AnDv0789) July 9, 2025
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पूल कोसळल्याबद्दल (Gujarat Bridge Collapse) दुःख व्यक्त केले आहे. मोदींनी ट्विट करत म्हंटल कि, वडोदरा येथे पूल कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मला खूप दुःख आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझी तीव्र संवेदना. जखमी लवकर बरे होतील अशी आशा आहे. यासोबतच, पंतप्रधान मदत निधीतून मृतांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
काँग्रेसची टीका? Gujarat Bridge Collapse
गुजरातमधील काँग्रेस नेते आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी गंभीरा पूल कोसळल्याचा व्हिडिओ शेअर करतप्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीरा पूल बऱ्याच काळापासून वाईट स्थितीत होता. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा सवाल अमित चावडा यांनी केला.




