धक्कादायक! गुजरातमध्ये BSF जवानाची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका BSF जवानाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. गुजरातच्या खेडामध्ये एका तरुणाने बीएसएफ जवानाच्या मुलीचा व्हीडिओ बनवून व्हायरल केला होता. यामुळे हा जवान सदरील तरुणाला जाब विचारण्यासाठी त्याचा घरी गेला होता. मात्र त्या ठिकाणी भलतंच घडले.

जाब विचारायला गेलेल्या जवानावर सात लोकांनी मिळून काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला (Murder) केला होता. या घटनेत जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्या सात हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ज्या बीएसएफ जावनाचा मृत्यू झाला त्यांच्या घरामध्ये कमावणारं दुसरं कुणाीही नाही. त्याच्या माघारी पत्नी, मुलगी आणि तीन मुलं असा परिवार आहे.

आम्ही जेव्हा आरोपींच्या घरी गेलो तेव्हा तिथे 7 लोक होते. त्यांनी आमच्यावर लाठ्या-काठ्या आणि फावड्याने हल्ला (Murder) केला. मलादेखील मारहाण केली असा आरोप जवानाच्या पत्नीने केला आहे. ‘हा हल्ला पूर्ण प्लॅनिंगने झाला होता. तिथे नंतर 30 ते 35 लोक आले. त्यांनीही आमच्यावर हल्ला केला. कुणीही आमची मदत केली नाही’ असेदेखील मंजुला बेन यांनी सांगितले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!