काँग्रेस आमदाराच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना चिरडले, 6 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गुजरातमधील आणंद या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार यांच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले आहे. या अपघातात (accident) 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. या अपघातात (accident) रक्षाबंधनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि आईचा मृत्यू झाला आहे.

काँग्रेस आमदाराच्या जावयावर आरोप
कार चालकावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालक हा काँग्रेस आमदाराचा जावई आहे.हाती आलेल्या माहितीनुसार, हा अपघात (accident) आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

पोलिसांकडून गुन्हा दाखल
या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. या अपघातात (accident) मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मामाच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी आणि त्यांच्या आईचाही समावेश आहे. या प्रकरणी सोजित्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सदोष मनुष्यवधा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर