Gujrat Diomond Industry | सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी गरिबांपासून ते सर्वसामान्य माणसांना देखील या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. शेतकरी असो किंवा मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार असो. सगळ्यांनाच या महागाईचा चटका बसत आहे. सध्या भारतामध्ये हिऱ्या उद्योगात देखील मंदी आल्याची पाहायला मिळत आहे. ही मंदी आल्याने अनेक कामगारांना कामावरून काढण्यात आलेले आहे. परंतु याच कामगारांनी अगदी टोकाचे पाऊल उचलून त्यांच्या आयुष्य संपवलेले आहे.
यादी डायमंड वर्कर्स युनियनने गुजरातने 15 जुलै रोजी एक सुसाईड हेल्पलाइन नंबर चालू केला होता. आणि त्या नंबर वर तब्बल 1600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कॉल केलेला आहे. हे कर्मचारी आर्थिक परिस्थितीशी झुंज देत असल्यामुळे त्यांनी या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्याचे देखील समोर आलेले आहे.
याबद्दल माहिती देताना डायमंड वर्कर्स युनियन गुजरातचे उपाध्यक्ष भावी स्टंप यांनी सांगितलेले आहे की, “सुरतमध्ये गेल्या 16 महिन्यांमध्ये तब्बल 65 हिरे कामगारांनी आत्महत्या केलेली आहे. अनेकांचे पगार कपात झाले होते. त्याचप्रमाणे आर्थिक मंदीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.” सुरत हे शहर प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी जगातील जवळपास 90% हिरे कापले जातात आणि पोलीस देखील केले जातात. या केंद्रामध्ये आतापर्यंत 15 लाख कर्मचारी काम करतात. त्यांनी 15 जुलै रोजी हा हेल्पलाइन नंबर चालू केला होता.
याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत आम्हाला 1700 पेक्षा अधिक कॉल झालेले आहेत. त्यापैकी अनेकांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तर बहुतेक येणारे कॉल हे बेरोजगार होते. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळण्याची चिंता असल्याने हे कॉल आलेले आहेत.”
याबाबत भावेश टंक म्हणाले की, “ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कामकाज झाली आहे. ते लोक त्यांच्या मुलांच्या शाळेची फी, घर भाडे, घराचे मासिक हप्ते बाकीच्या सगळ्या गोष्टी भरण्यासाठी मदत मागत आहे. परंतु रशिया आणि इज्राइल गाझा यांचे युद्ध चालू असल्यामुळे प्रमुख बाजारपेठेतील चीनमधील कमकुवत मागणीमुळे अतिरिक्त पुरवठा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास 50 हजार कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहे.”