लवकरच एकनाथ खडसेंचे कारनामे समोर येतील; गिरीश महाजनांनी दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
आजपर्यंत खडसेंनी काहीच केलं नाही, म्हणून मी शहरासाठी काहीतरी करतोय हे खडसेंना (Eknath Khadse) दाखवायचं आहे. तसेच खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी शहरासाठी किती पैसे दिले? असा सवालदेखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

गिरीश महाजनांचा खडसेंना इशारा
गिरीश महाजन यांनीदेखील एकनाथ खडसें (Eknath Khadse) यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंना भरपूर वेळ असल्याने ते इकडे तिकडे फिरत राहतात. मात्र त्यांचेही कारनामे लवकरच सगळ्यांच्या समोर येतील असा इशारा यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला.

एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा
जळगाव जिह्यातील राजकारणाविषयी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपने डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी (Eknath Khadse) त्या नीटनेटक्या करायच्या. हे आतापर्यंतचं उदाहरण असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!