‘स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि…’, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) करत असतात. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान (controversial statement) गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमादरम्यान केले. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे, असेदेखील गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील यांचे चॅलेंज
50 खोके एकदम ओक्के, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हिणवलं जात आहे. याच टीकेवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना (controversial statement) उघडपणे चॅलेंज दिले आहे. “मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”, असे थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीकाकारांना दिले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर