हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gupteshwar Mahadev Temple) आपल्या देशात अनेक अद्भुत, प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची काही ना काही खासियत आहे. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. जो अत्यंत अलौकिक आणि प्रभावी आहे. यांपैकी एका मंदिरात आजही महाभारतातील एक योद्धा महादेवाच्या दर्शनासाठी येतो आणि आपल्या मुक्तीची याचना करतो, अशी मान्यता आहे. अर्थात या मंदिराचा थेट महाभारताशी संबंध असल्याचे आढळून येते. हे मंदिर नेमके कोणते आहे? आणि या मंदिरात येणार योद्धा कोण? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
आपल्या भारतात प्राचीन संस्कृती आणि परंपरेल विशेष महत्व आहे. तर ग्रंथ, पुराणांना अनन्य साधारण स्थान आहे. यापैकी एक म्हणजे महाभारत. अनेक युगे लोटली मात्र आजही महाभारताविषयी असणारी जिज्ञासा कमी झालेली नाही ही याची खासियत. (Gupteshwar Mahadev Temple) अशा महाभारतातील एक महान योद्धा आजही आपल्या मुक्तीच्या शोधात आहे. असे म्हटले जाते की, गेल्या ५ हजार वर्षांपासून दररोज न चुकता हा योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी एका शिवमंदिरात जातो. याच मंदिराविषयी आपण माहिती घेत आहोत.
महाभारताशी संबंध असणारे शिव मंदिर (Gupteshwar Mahadev Temple)
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यात असिरगडावर एक शिवमंदिर आहे. हे मंदिर असिरेश्वर वा गुप्तेश्वर नावाचे प्रसिद्ध आहे. हा किल्ला बुऱ्हानपूरच्या उत्तरेस सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे. पुरातत्व विभागाला मिळालेल्या अवशेषांवरून या मंदिराचा थेट रामायण आणि महाभारताशी संबंध असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात महाभारतातील एक महान योद्धा दररोज न चुकता दर्शनासाठी येतो. हा योद्ध म्हणजे द्रोणाचार्य यांचा पुत्र ‘अश्वत्थामा’.
महादेवाचा परमभक्त – अश्वत्थामा
महाभारतात अनेक शूर तसेच पराक्रमी योद्धे झाले. ज्यामध्ये अश्वत्थामा यांच्या नावाचा समावेश आहे. अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र आहे. त्यामुळे अश्वत्थामा हे युद्धशास्त्र आणि शस्त्रास्त्र कलेत पारंगत होते. मुख्य म्हणजे, ते महादेवाचे परम भक्त होते. महाभारतात त्यांनी कौरवांच्या बाजूने लढा दिला. अश्वत्थामाने पांडवांचे मनोबल खच्ची केले. त्यावेळी श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठीरला एक योजना सांगितली. (Gupteshwar Mahadev Temple) त्यानुसार, श्रीकृष्णांनी रणांगणात अश्वत्थामा मारला गेल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्यांनी याबाबत युधिष्ठीराला विचारले असता त्याने हे वृत्त खरे असल्याचे सांगितले. महाभारतात अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता. त्यामुळे मृत झालेला मानव होता की हत्ती हे मला माहित नाही, असे युधिष्ठिराने सांगितले.
अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकताच पिता द्रोणाचार्यांना धक्का बसला आणि पुत्रवियोगाने ते भावूक झाले. याचा फायदा पांचाल पुत्र धृष्टद्युम्न याने घेतला आणि द्रोणाचार्यांचा वध केला. पित्याच्या वधाची वार्ता अश्वत्थामाला समजली आणि त्याने सूड भावनेने पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरेच्या गर्भात वाढत असलेल्या अभिमन्यू पुत्र परीक्षितालासुद्धा मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. (Gupteshwar Mahadev Temple) आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असलेल्या अश्वत्थामाला श्रीकृष्णाने श्राप दिला आणि या या शापातून त्याची आजही मुक्तता झालेली नाही.
श्रीकृष्णाने काय शाप दिला?
गर्भातील परीक्षिताचे रक्षण श्रीकृष्णांनी केली आणि अश्वत्थामाला त्याच्या कृतीचा धडा दिला. श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला डोक्यावर भळभळती जखम दिली आणि ही जखम बरी करण्यासाठी तो हळद आणि तेल मागत युगानयुगे फिरेल असा शाप दिला. आजही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात नर्मदा नदीवरील गौरीघाटावर अश्वत्थामा हळद आणि तेल मागत भटकतो, अशी येथील मान्यता आहे. (Gupteshwar Mahadev Temple)
अश्वत्थामाची मुक्ती याचना
अश्वत्थामा निस्सीम शिवभक्त होता. त्यामुळे श्रीकृष्णांनी दिलेल्या शापातून मुक्ती मिळावी म्हणून तो नियमित महादेवाकडे याचना करण्यासाठी असिरगड येथील मंदिरात सकाळी पूजा करतो. मात्र, कोणालाही ही पूजा कोणी केली? ते दिसत नाही. स्थानिकांच्या मते, श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा इथे भटकतोय. (Gupteshwar Mahadev Temple) अश्वत्थामा असिरगड किल्ल्यातील तलावात स्नानादी कार्ये उरकून नियमित सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुल वाहून निघून जातात, असे म्हटले जाते. गावकऱ्यांपैकी काहींनी अश्वत्थामाला पाहिल्याचे धेंडंखील म्हटले जाते. मात्र, जो अश्वत्थामाला पाहतो त्याचे मानसिक संतुलन बिघडते, असा दावा स्थानिक करतात.