H5N1 Virus | गाईच्या दुधात सापडला बर्ड फ्लू व्हायरस; WHO ने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | H5N1 Virus दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधामध्ये अनेक प्रथिने असतात. त्याचप्रमाणे आणि पोषक घटक देखील असतात यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. गाईचे दूध हे अधिक पौष्टिक आणि फायदेशीर मानले जाते.

परंतु आता नुकतेच हाती आलेले माहितीनुसार गाईच्या दुधामध्ये बर्ड फ्ल्यू (H5N1 Virus) विषाणू सापडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतचा इशारा देखील दिलेला आहे. हा विषाणू अमेरिकेत सापडलेला आहे. याबाबत अमेरिकेतील अनेक डेऱ्यांमधून दुधाचे नमुने घेऊन प्रयोग शाळेमध्ये त्यांची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत.

बर्ड फ्ल्यू व्हायरस जीवघेणा | H5N1 Virus

बर्ड फ्लूच्या विषाणूबद्दल माहिती आपल्याला आहेच. भारतात देखील या विषाणूचा प्रभाव दिसून आलेला आहे. हा विषाणू पक्षांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो. त्याचप्रमाणे हा विषाणू इतका खतरनाक आहे की, या विषाणूची लागण झालेल्या माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी हा विषाणू भारतात अनेक ठिकाणी पसरला होता. हा विषाणू मोठ्या संख्येने कोंबड्या आणि इतर प्राण्यांमध्ये आढळला होता. त्यावेळी त्या प्राण्यांना जिवंत गाडण्यात आलेले होते. परंतु काही या महिन्याच्या सुरुवातीला हा विषाणू गाईमध्ये देखील आढळून आलेला आहे. त्यामुळे आता सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण गाईचे दूध सगळेच पितात.

दुधात हा विषाणू आला कुठून?

बाजारात उपलब्ध असलेले पॅके केलेले दूध हे पाश्चराइज्ड दूध आहे. हे दूध गरम करून नंतर थंड केल्याने त्यातील हानीकारक विषाणू नष्ट होतात. नंतर ते पॅक करून बाजारात पाठवले जाते. या दुधात बर्ड फ्ल्यूचे विषाणू आढळले आहेत. परंतु भारतातील गाईच्या दुधात हा विषाणू अजून तरी सापडलेला नाही. केवळ अमेरिकेतच हा विषाणू गाईच्या दुधात सापडलेला आहे.

अमेरिकेतील डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला बर्ड फ्ल्यूची लागण झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेले माहितीनुसार माणसांमध्ये बर्ड फ्ल्यू पसरण्याची ही पहिली घटना आहे. त्यामुळे जे गाईचे दूध घेतात त्यांच्या शरीरात देखील हा विषाणू पोहचू शकतो. अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे.

रिसर्च चालू आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या गायीला बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण झाली, तर हा विषाणू गायीच्या कच्च्या दुधातही पोहोचू शकतो, जो मानवापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. मात्र, हा विषाणू कच्च्या दुधात किती काळ जगू शकतो हे शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे.