औरंगाबाद – कन्नड तालुक्यात मंगळवारी दिवसभर आणि रात्री पडलेल्या धुवाधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी आणखी वाढेल या धास्तीने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. तसेच तालुक्यातील आठही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
कन्नड शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अतिवृष्टीमुळे शिवना नदी ला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या महापुराने अंधानेर, शिवनानगर, बहिरगाव, डोणगाव, हातनूर या गावातील ग्रामस्थांना भीतीपोटी रात्र जागून काढावी. लागली बुधवारी सकाळी पूर्व असल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
शिवना नदी वरील हातनुर येथील कोल्हापुरी बंधारा पुरामुळे फुटला आहे. जळगाव घाट ते जैतापुर रस्त्यावरील पूल देखील वाहून गेला आहे. चिवळी येथे माती नाला बांध फुटला, तर नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांच्या पुराचे पाणी ओसरत असतानाच, बुधवारी सकाळी पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली आहे.
सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासांत महसूल निहाय मंडळात पडलेला पाऊस –
कन्नड 116 मिमी, चापानेर 150 मिमी, देवगाव 110 मिमी, चिकलठाण 110 मिमी, पिशोर 117 मिमी, करंजखेडा 112 मिमी, नाचवेल 77 मिमी व चिंचोली 74 मिमी