हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. केसगळती, केसांत कोंडा होणे, केसाला फाटे फुटणे अशा बऱ्याच समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे पावसाळा आला की, केसांची खूप काळजी घ्यावी लागते. ती कशी घ्यावी? याबाबत आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात केसांचे आरोग्य बिघडण्याचे कारण (Hair Care)
पावसाळ्यात केसांशी संबंधित अनेक समस्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील आद्रता. पावसाळ्याच्या दिवसात हवेतील आद्रता वाढते आणि यामुळे हवेत ओलावा राहतो. परिणामी, केस चिकट होणे, केसात कोंडा होणे आणि मोठ्या प्रमाणात केसगळती होणे या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी कशी घ्यावी? त्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.
1. ऑइल मसाज
बऱ्याच लोकांना केसांना तेल लावायला आवडत नाही. असे असले तरीही पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे, हे समजून घ्या. (Hair Care) कारण ऑइल मसाजमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसगळतीपासून सुटका मिळते. शिवाय ऑईलिंगमुळे स्काल्पसुद्धा निरोगी राहतो. यासाठी नियमित रात्री केसाला तेलाने मसाज करा आणि सकाळी चांगल्या व तुमच्या केसांना सूट होणाऱ्या शॅम्पूने केस धुवा.
2. कंडिशनरचा वापर
पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असते. (Hair Care) त्यामुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा शॅम्पूनंतर आठवणीने कंडिशनर वापरा. कारण, कंडिशनरच्या वापराने केस फ्रिज होत नाही आणि त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येत नाही.
3. ओल्या केसांत कंगवा फिरवू नका
बऱ्याच लोकांना ओल्या केसांत कंगवा किंवा ब्रश फिरवण्याची सवय असते. (Hair Care) यामुळे केस तुटतात आणि केसांची मुळेदेखील कमकुवत होतात. त्यामुळे ओल्या केसांमध्ये कंगवा किंवा ब्रश फिरवून नका.
4. मायक्रो टॉवेलचा वापर
तुम्ही तुमच्या केसांसाठी कोणता टॉवेल वापरता, यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते. न केवळ पावसाळ्यात तर कोणत्याही ऋतूमध्ये ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेलचा वापर करू नका. तर मायक्रो टॉवेलचा करा. खास करून पावसाळ्यात सतत केस भिजत असतात. त्यामुळे वारंवार केस पुसावे लागतात. (Hair Care) यासाठी मायक्रो टॉवेल फायदेशीर ठरतो. यामुळे केसगळतीची समस्या कमी होते.