Hair Straightening Treatment | हेअर-स्ट्रेटनिंग करणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, महिलेची झाली किडनी खराब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hair Straightening Treatment | आज-काल अनेक मुली या पार्लरमध्ये जाऊन त्यांच्या केसांसाठी खूप महागड्या ट्रीटमेंट करत असतात. त्यांचे केस सरळ करून घेतात किंवा केसांना वेगवेगळे कलर लावतात. त्यामुळे त्यांचे केस जास्तच आकर्षक आणि चांगले दिसतात. परंतु आता या हेअर स्ट्रेटनिंग (Hair Straightening Treatment) आणि हेअर कलरिंगच्या नादात एका महिलेची किडनी खराब झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की, केसांना कलर लावण्याचा आणि किडनी खराब होण्याचा काय संबंध आहे? तर आपल्या केसांमध्ये जो कलर लावला जातो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात आणि त्याचा आपल्या पूर्ण शरीरावर प्रभाव होतो आणि त्यामुळे त्या महिलेची किडनी खराब झालेली आहे. आता हा प्रकार सविस्तरमध्ये जाणून घेऊया.

एक 26 वर्षीय महिला सलूनमध्ये तिच्या केसांच्या ट्रीटमेंटसाठी (Hair Straightening Treatment) गेली होती. त्यादरम्यान तिच्या किडनीला तीन ठिकाणी दुखापत झालेली आहे. या महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार डॉक्टरांनी काही केस स्मूथ आणि स्ट्रेट करणाऱ्या उत्पादनांच्या मूत्रपिंडाची दुखापतीशी कनेक्शन जोडलेले आहे. ही महिला त्या सलूनमध्ये जाण्यापूर्वी तिला कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास नव्हता. जेव्हा ती डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिला अचानक उलट्या, जुलाब आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्याच दिवशी सलूनमध्ये केसांच्या ट्रीटमेंटनंतर तिला किडनीची गंभीर दुखापत झाली. त्या महिलेने सांगितले की, केसांच्या ट्रीटमेंट दरम्यान तिला जळजळ होत होती. त्यानंतर तिच्या टाळूमध्ये अल्सर विकसित झाला.

संपूर्ण वैद्यकीय चाचणी केल्यानंतर असे दिसून आले की, त्या महिलेच्या रक्तातील प्लाझ्मा क्रिएटिनिनची पातळी वाढली आहे. प्लाझ्मा क्रिएटिनिन हे एक वेस्ट प्रोडक्ट आहे. जे स्नायूंमधून येतं. जेव्हा ते रक्तात प्रवेश करते तेव्हा ते मूत्रपिंडाद्वारे फिल्टर केलं जातं. ही महिला जेव्हा हेअर ट्रीटमेंटसाठी सलूनमध्ये गेली होती, तेव्हा तिच्या केसांवर एक क्रीम लावली होती. ज्यामध्ये 10 टक्के ग्लायऑक्सीलिक ऍसिड होतं. या केमिकलमुळे तिची किडनी खराब झाली असल्याची गोष्ट समोर आलेली आहे.

केस सरळ करण्यासाठी ग्लायऑक्सीलिक ऍसिड ही क्रीम जबाबदार असते. ज्यामुळे आपल्या किडनीवर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव होतो. त्याचप्रमाणे हेअर स्ट्रेटनिंग प्रॉडक्टमुळे महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा देखील धोका वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी जाणार असाल तर आत्ताच सावध व्हा आणि तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवा.