Hajimalang Gad Funicular Train: देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रेनचे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या ट्रेनची ट्रायल सुरु असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत याचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे कल्याणमधील हाजीमलंग (Hajimalang Gad Funicular Train) पर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात येणाऱ्या फ्युनिक्युलर ट्रेनचे काम 2012 पासून सुरू आहे.
याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Hajimalang Gad Funicular Train) उपविभागीय अभियंता (उल्हासनगर) प्रशांत मानकर म्हणाले की ” सध्या ट्रायल रन चालू आहेत आणि मे पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संरचनात्मक मूल्यांकनांसह सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, ही सेवा सार्वजनिक वापरासाठी तयार होईल, ”.
जवळपास एक दशकापासून विलंबित असलेल्या या प्रकल्पाला 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर-सुयोग-यशिता कन्सोर्टियमला कार्यादेश दिलेला होता. मलंगवाडी ते कल्याण (Hajimalang Gad Funicular Train)या मलंग गड पठारावर बिल्ड-ऑपरेट-हस्तांतरण (बीओटी) तत्त्वावर फ्युनिक्युलर रेल्वे बांधण्याचे काम कंसोर्टियमला देण्यात आले होते. तथापि, मंजूरी न मिळाल्याने जमिनीचे काम २०१२ मध्येच सुरू झाले.
काय आहे वैशिष्ट ?(Hajimalang Gad Funicular Train)
मलंग गड फ्युनिक्युलर रेल्वे, ही 1 किमी पेक्षा जास्त असून 320 मीटर उंचीवर आहे, एकदा ही ट्रेन लोकांसाठी खुली केल्यावर किमान 42 प्रवासी वाहून नेईल. तिकिटाचे भाडे प्रति ट्रिप 60 रुपये ठेवण्यात आले होते, परंतु प्रकल्पाला विलंब होत असल्याने भाडे सुधारित केले जाईल, असे मानकर यांनी सांगितले.
PWD अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फ्युनिक्युलर रेल्वे (Hajimalang Gad Funicular Train) नियमित दिवसांमध्ये प्रत्येक दिशेने एक कोच घेऊन चालेल. तथापि, उर्स दरम्यान, येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रत्येक दिशेने दोन कोच धावतील. एकदा ही सेवा लोकांसाठी सुरु झाल्यास दिवसाचे 12 तास सुरु राहील. या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला 45 कोटी रुपये मोजण्यात आली होती. प्रकल्प उभारणाऱ्या बीओटी कंसोर्टियमला त्याची किंमत वसूल करण्यासाठी 24 वर्षे सेवा चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे.




