चहा-कॉफी नव्हे तर आरोग्यासाठी हे 5 पेय ठरतात फायदेशीर; अनेक आजारांवर होतो मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्यापैकी जवळपास सर्वचजण चहा किंवा कॉफी पीत असतात. सकाळी या दोन्हींमध्ये एक जरी पेय पेले तरी ताजेतवाने वाटते. तसेच अंगातील आळस देखील जातो. परंतु जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील शरीरासाठी चांगले नसते. अशावेळी तुम्ही पुढे देण्यात आलेली ही पाच पेय दररोज पिऊ शकता. यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील आणि याचा विपरीत परिणाम शरीरावर देखील होणार नाही. हे 5 पेय नेमके कोणते आहेत आपण जाणून घेऊया.

ग्रीन टी – ग्रीन टी चवीला चांगली लागत नाही असे म्हणत अनेकजण ती पिणे टाळतात. परंतु या ग्रीन तिथेच शरीराला खूप सारे फायदे होतात. ग्रीन टी शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. रोज सकाळी ग्रीन टी पिल्यामुळे तुमचे वजन कमी होते. ग्रीन टीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ग्रीन टी पिणे हृदयासाठी देखील चांगली असते.

नारळाचे पाणी – नारळाचे पाणी किंवा नारळाचे शहाळे खाणे आरोग्यासाठी सर्वात चांगली असते. नारळाच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, लॉरिक ॲसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. तसेच या पाण्यामध्ये झिंक भरपूर प्रमाणात आढळते. हे सर्व गुणधर्म शरीरात गेल्यानंतर याचा शरीराला आणि आरोग्याला चांगला फायदा होतो.

बीटाचा रस – बीट खाल्यामुळे शरीरातील रक्त वाढते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु बीटाचा रस पिणे देखील शरीरासाठी तितकेच फायदेशीर ठरते. बीटाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व आणि विविध खनिजे आढळून येतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून स्नायूंची शक्ती वाढते.

लिंबू पाणी- शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. लिंबू पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी असे विविध पोषक घटक असतात. त्यामुळेच आपल्याला लिंबू पाणी पिल्यानंतर अंगात तरतरी आल्यासारखे जाणवते.

मध आणि दालचिनीचे पाणी – संधिवाताच्या आजारांवर मात करायची असेल तर मध आणि दालचिनीचे पाणी प्यावे. तसेच हृदयविकाराचा आजार असेल तर अशा व्यक्तीने मध आणि दालचिनीचे सेवनात घ्यावे. हे पाणी पिल्यानंतर देखील शरीराला अनेक फायदे मिळतात.