मोठी बातमी! राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’ सुट्टी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने राम मंदिर लोकार्पण भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी जाहीर केली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 22 जानेवारी रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाली आहेत की, लोकांमध्ये सोहळ्यासाठी असलेल्या उत्साहात केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरे तर यापूर्वी आयोध्यातीलनिमित्त अनेक राज्यांनी शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील यादिवसासाठी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप राज्य सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. यात केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत कार्यालये, केंद्रीय संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला सुट्टी जाहीर करा

इतकेच नव्हे तर, राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याची मागणी बार काऊंसिल ऑफ इंडियाने केली आहे. या संबंधित पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पाठविले आहे. त्यामुळे आता या मागणी बाबत सरन्यायाधीश काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .