राज्यात हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (HBPCL) करणार कोवॅक्सिन लसींचे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : राज्यात कोरोना साथ पसरली आहे. या साथीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. मात्र रुग्ण संख्या असली तरी नागरिकांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. राज्यात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच राज्य सरकार जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. लसीकरणाच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात राज्यात हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (HBPCL) कोवॅक्सिन लसींचे उत्पादन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आणखी लसी उपलब्ध होण्यास मदत होईल.

याबाबत बोलताना बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (HBPCL) चे एम डी म्हणाले की, आम्हाला कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनास मान्यता मिळाली आहे. आणि पुढील प्रक्रियेसाठी भारत बायोटेकशी चर्चा केली आहे. आम्ही ८ महिन्यांत उत्पादन सुरू करणार आहोत”. अशी माहिती HBPCL एमडीनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी

राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली असून, मंगळावारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १४ हजार १२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १४ हजार १२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ४७७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३५ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ३० हजार ३६७ आहे.

राज्यात एकूण ३ कोटी ५२ लाख ७७ हजार ६५३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ६१ हजार ०१५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात १७ लाख ६८ हजार ११९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ९ हजार ३१५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Leave a Comment