IND vs ENG Test : चेतेश्वर पुजाराचे टीम इंडियात कमबॅक, ‘या’ खेळाडूचे स्थान धोक्यात

cheteshwar pujara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया मागच्या वर्षी न झालेली सीरिजची पाचवी टेस्ट (IND vs ENG Test) खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. या टेस्टसाठी (IND vs ENG Test) टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराचे टीममध्ये पुनरागमन झाले आहे. 1 जुलैपासून या टेस्टला (IND vs ENG Test) सुरुवात होणार आहे. हि टेस्ट बर्मिंघममध्ये खेळवण्यात येणार आहे. चेतेश्वर पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे हनुमा विहारीचे टीममधील स्थान धोक्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतर पुजाराला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला होता. यानंतर हनुमा विहारीला पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली होती. पुजाराने इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ससेक्स काऊंटीकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली. यामुळे त्याची इंग्लंड दौऱ्यातल्या 17 सदस्यीय भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. पुजारा टीममध्ये आल्यामुळे विहारीला टीममध्ये स्थान मिळणार का? तसंच मिळालं तर तो कोणत्या क्रमांकावर खेळणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगला तयार
2020-21 साली सिडनी टेस्टदरम्यान (IND vs ENG Test) विहारीने त्याच्या बॅटिंगने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्या इनिंगमध्ये विहारीने 23 रनच केले पण मॅचच्या हिशोबाने ही इनिंग अत्यंत महत्त्वाची होती. हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतरही विहारीने 160 बॉल खेळले, ज्यामुळे भारताने मॅच ड्रॉ केली. विहारीच्या या खेळीचं अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले होते. आपण टीममध्ये कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगला तयार आहोत, बॅटिंग क्रमांकाविषयी मला कोणतीही चिंता नसल्याचे हनुमा विहारी म्हणाला आहे.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका