हार्दिक पांड्याचे रोहितशी गैरवर्तन; हिटमॅनला थेट सीमारेषेवर उभा केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात (GT Vs MI Match) मुंबईचा नवनिवार्चित कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत गैरवर्तन केलं. मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिकने अनेकदा रोहितच्या फिल्ड पोझिशन मध्ये बदल केला. शेवटी शेवटी तर त्याने रोहितला थेट सीमारेषेवर उभं केले. हार्दिकच्या या अशा वागण्याने रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

खरं तर रोहित शर्माला आपण नेहमीच ३० यार्ड सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण करताना बघितलं आहे. परंतु गुजरात विरुद्धच्या कालच्या सामन्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. हार्दिक पंड्याने रोहितला सीमारेषेवर उभा केला. एवढच नव्हे तर डावाच्या अखेरच्या काही षटकात तर हार्दिक सतत रोहितची फिल्ड पोझिशन बदलत होता, रोहितला पण यावर विश्वास बसत नव्हता, त्यामुळे रोहित त्याला विचारत होता की मला पाठवत आहेस का? त्यानंतर रोहितलाही समजलं हार्दिक त्यालाच सीमारेषेवर जायला सांगत आहे. रोहित काहीही न बोलता बॉण्ड्रीवर गेला.

पहिल्या सामन्यात हार्दिक फेल-

दरम्यान, प्रथमच मुंबईचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिक पंड्या पहिल्याच सामन्यात पूर्णपणे फेल गेला. बुमराह सारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज असताना हार्दिकने स्वतः डावाचे पहिले षटक टाकलं. मात्र गुजरातच्या फलंदाजांनी हार्दिकची पिटाई केली. हार्दिकच्या ३ षटकात गुजरातने ३० धावा चोपल्या, त्याला एकही बळी मिळाला नाही. त्यानंतर फलंदाजी मध्येही अखेरच्या षटकात मुंबईला हार्दिकची गरज असताना तो बाद झाला आणि मुंबईचा ६ धावांनी पराभव झाला.