मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना टोपी घालून शेंडी लावली; हरिभाऊ राठोडांची बोचरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच या संदर्भात त्यांनी राजपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे यांना टोपी घालून शेंडी लावली” असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, “कायदा पास झालेला नाही. पूर्वीपासून रक्त नातेसंबंधानुसार सुविधा मिळत असतात. जे मिळालं तो कायदा नाही. सरकारने नवीन काहीही केलेलं नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे यांना टोपी घातली अमी शेंडी लावली आहे. झालेला निर्णय म्हणजे फसगत आहे”

छगन भुजबळांवर टीका

त्याचबरोबर, “छगन भुजबळ दिखावा करत आहेत. काल पास केलेल्या ठरावांचं काहीही होणार नाही. मागासवर्गीय आयोगावर कुठलंही आक्षेप घेता येत नाही. भुजबळांनी आक्षेप घेतला, पण त्याचा काहीही उपयोग नाही. भुजबळ हेच समाजाची फसवणूक करत आहेत. भुजबळांनी सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकावा. भुजबळांना आरक्षणात फारसं कळत नाही” अशी टीका राठोड यांनी भुजबळांवर केली आहे.

दरम्यान, सध्या राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असल्या तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाचे आणि मनोज जरांगे पाटलांचे फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. तसेच दुसऱ्या बाजूला, जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांची हात मिळवणी केल्याचे देखील म्हणले जात आहे.