Harmful Foods For Bones Calcium | ‘हे’ पदार्थ करतात हाडातील कॅल्शिअम कमी, जास्त प्रमाणात खात असाल तर आताच करा बंद

Harmful Foods For Bones Calcium
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Harmful Foods For Bones Calcium  | आज-काल लोकं 25 ते 30 वर्षाची झाले की त्यांना गुडघेदुखी लगेच चालू होतेm आणि यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. परंतु हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम असणे खूप गरजेचे असते. कॅल्शियमची आपल्या शरीरात कमतरता असेल तर हाडे कमकुवत होतात. तसेच निर्जीव होतात आणि अगदी थोड्याशा धक्क्याने देखील हार्ड फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. कॅल्शियम हे केवळ आपल्या हाडांसाठीच उपयोगी नसते तर ते आपले दात आणि मेंदूसाठी देखील खूप गरजेचे असते. जर तुम्ही जास्त चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तरी देखील तुमची हाडे कमकुवत होतात. आता आपण अशा काही पदार्थांची माहिती जाणून घेऊया जे तुम्ही जास्त खाल्ल्याने तुमच्या हाडातील कॅल्शियम कमी होते (Harmful Foods For Bones Calcium) आणि तुमची हाडं कमजोर होतात.

मीठ

आपण जेवणामध्ये मिठाचा वापर करतच असतो. तुम्ही जर जास्त मीठ खात असाल, तर त्यामुळे तुमची हाडे कमजोर होत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही जेवणावर वरून मीठ घेतले तरी तुमचे कॅल्शियम कमी होते. (Harmful Foods For Bones Calcium ) त्यामुळे जेवणात कमीत कमी मिठाचा वापर करा.

साखर | Harmful Foods For Bones Calcium 

साखर ही आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. परंतु जर तुम्ही अति गोड खात असाल तर तुमच्या हाडे कमजोर होतात. साखरेमुळे आपल्या हाडातील कॅल्शियम कमी होते. आणि मधुमेहासारख्या अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.

कोल्ड्रिंक्स

आज-काल अनेक लोक सातत्याने कोल्ड्रिंक्स घेत असतात परंतु अति प्रमाणात कोल्ड्रिंक्स किंवा सोडा प्यायल्याने हाडातील कॅल्शियम कमी होते आणि आपली हाडे ठिसूळ होऊ लागतात.

चहा कॉफी आणि चॉकलेट

चहा, कॉफी तसेच चॉकलेट हे आपल्या हाडातील कॅल्शियम कमी करतात (Harmful Foods For Bones Calcium ) आणि आपले हाडे कमकुवत होतात. कारण त्यामध्ये जास्तीत जास्त कॅफिनचा वापर केला जातो. त्यामुळे चहा आणि कॉफीचे खूप कमी सेवन करा.

अल्कोहोल

अल्कोहोल आपल्या हाडांना कमकुवत करतात. तसेच आपल्या हाडांची डेन्सिटी म्हणजेच घनता देखील कमी करतात त्यामुळे आपली हाडे ठिसूळ होतात.

बटाटा टोमॅटो मशरूम मिरची

काही पदार्थ ऑक्सालिक ऍसिडचे चांगले स्रोत असतात ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.

विटामिन डी

तुमच्या शरीरात जर विटामिन डीची कमतरता असेल तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे विटामिन डीची कमतरता असलेल्या लोकांना योग्य आहार देण्याचा सल्ला देतात.

सोडियमचे पदार्थ

तुम्ही जर सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन केले तरी देखील तुमच्या हाडांची झीज होते आणि तुमचे हाडे कमकुवत होतात म्हणजेच तुमच्या हाडातील कॅल्शियम कमी होते. (Harmful Foods For Bones Calcium )