Harry Potter स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘कॅरी ऑन’ या सीरिजमधील त्यांनी भूमिका साकारली होती. तर हॉलिवूड चित्रपट ‘हॅरी पॉटर’मधील सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

एजंट जोनाथन लॉयड यांनी ज्येष्ठ अभिनेते लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची माहिती दिली. लेस्ली फिलिप्स यांनी झोपेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन स्ट्रोक आले होते, असे लॉयड यांनी सांगितले. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळातील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपट, टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्ये काम केले.

अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या मोठ्या यशानंतर लेस्ली फिलिप्स यांनी ‘डॉक्टर इन द हाऊस’, टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘एम्पायर ऑफ द सन’ आणि सिडनी पोपच्या ‘आउट ऑफ आफ्रिका’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला.