अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या युवकास सश्रम कारावास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी युवकाला एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली. दिनेश विलास देटके (वय- 22, रा. कार्वेनाका, कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी ही शाळेला तसेच क्लासला जात असताना आरोपी दिनेश देटके हा तीचा वारंवार पाठलाग करीत होता. तसेच त्याने तीला अडवून प्रेमाची मागणी केली. ‘तुझ्या घराशेजारी माझी डान्स अ‍ॅकॅडमी आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु नाही म्हणालीस तर मी जीव देईन’ असे म्हणत त्याने त्या मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. वारंवार होणाºया या त्रासामुळे पिडीत मुलीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली. त्यावरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. अ‍ॅड. ऐश्वर्या यादव, अ‍ॅड. मनिषा जावीर, अ‍ॅड. कोमल लाड यांनी त्यांना सहकार्य केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात पाच साक्षिदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी दिनेश देटके याला एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.