मराठा आंदोलक आक्रमक! हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यांतील वातावरण तापले आहे. परिणामी, आज सकाळी आमदार निवास जवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य म्हणजे, या घटनेनंतर आकाशवाणी आमदार निवासाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही आरोपींना विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी आकाशवाणी आमदार निवास येथे पार्क करण्यात आली होती. याचंवेळी 2 मराठा आंदोलकांनी येऊन हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. याच्या सोबत आणखीन एक व्यक्ती होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हे तिघेजण देखील छत्रपती संभाजीनगर येथून आले होते. मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्यामुळे या तिघांनी मिळून ही कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

मुख्य म्हणजे, याबाबत प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी म्हणले आहे की, “या तीन आंदोलकांवर कठोर कारवाई करु नका अशा सूचना मी आंदोलनकर्त्यांना दिल्या आहेत. हे आंदोलन शांततेत व्हायला पाहिजे, आमदारांची घरं जाळणं चुकीचं आहे. काही आमदारांनी बंदोबस्त घेतला आहे. मी मला बंदोबस्त घेतलेला नाही”

दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा बांधवांनी आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसात मराठा बांधवांनी दगडफेक, जाळपोळ, बस फोडल्या आहेत. तसेच, सत्ताधारी पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जे नेते गावात जात आहेत, त्यांच्या गाड्या फोडण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. तर दुसऱ्या बाजूला, “शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे” अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.