भाजपला मोठा फटका! मराठा आरक्षणासाठी आणखीन एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मुख्य म्हणजे, सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आता सत्तेधारी नेत्यांनीच सरकार विरोधात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. काल भाजप खासदार हेमंत पाटील मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्यानंतर आज भाजपच्या आणखीन एका नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे याचा मोठा झटका भाजपला बसला आहे.

मराठा आरक्षणासाठी बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आज लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राहुल नार्वेकर यांना पाठवलेल्या पत्रात लक्ष्मण पवार यांनी म्हटले आहे की,”महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”

दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे सत्ताधारी नेते देखील पेटून उठले आहेत. कालच हेमंत पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, आक्रमकाची भूमिका घेत आज आंदोलकांनी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या यांच्या बंगल्याची जाळपोळ केली आहे. तसेच, प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात तोडफोड केली. सध्या या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.