हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात (HDFC Bank FD Rate Hike) वाढ केली आहे. HDFC बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी ठराविक मुदतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 20 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 24 जुलै 2024 पासून लागू होतील. या नव्या व्याजदरानंतर, बँक 4 वर्षे 7 महिने – 55 महिन्यांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 7.40% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90% व्याजदर देते.
कसे असतील नवे व्याजदर –
HDFC बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 ते 29 दिवसांच्या कालावधीतील मुदत ठेवींवर 3% व्याज दर देत आहे. 30 ते 45 दिवसांमध्ये मॅच्युअर झालेल्या ठेवींवर 3.50% व्याज मिळेल, तर 46 दिवस आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या एफडीवर 4.50% व्याज मिळेल. हि बँक सहा महिने ते एक दिवस आणि ९ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 5.75% व्याज दर ऑफर देते. तसेच ९ महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6% व्याजदर ग्राहकांना देईल.
HDFC बँक एक वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 6.60% व्याजदर देईल, तर 15 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींना 7.10% व्याजदर ग्राहकांना देण्यात येईल. 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बँक 7.25% व्याज दर देत आहे. तसेच 21 महिने आणि दोन वर्षे आणि अकरा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 7% व्याज दर ऑफर करते. बँकेने 2 वर्षे 11 महिने – 35 महिन्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर 20 bps ने वाढवून 7.15% ते 7.35% केले आहेत आणि 4 वर्षे 7 महिने – 55 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 bps ने 7.20% वरून 7.40% पर्यंत वाढ केली आहे. HDFC बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे हे नक्की.