HDFC Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​आता FD वर मिळणार जास्त व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता HDFC Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

We are determined to strengthen process controls, says HDFC Bank chief  Jagdishan | Mint

14 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू

HDFC Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. नवीन दरांनुसार आता ग्राहकांना एफडीवर 7 टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे.

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

HDFC Bank चे नवीन एफडी दर 

7-14 दिवस 3%
15-29 दिवस 3%
30-45 दिवस 3.5%
46-60 दिवस 4.50%
61-89 दिवस 4.50%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष 6%
1 वर्ष ते 15 महिने 6.50%
15 वर्षे ते 18 महिने 7%
18 महिने ते 21 महिने 7%
21 ते 2 वर्षे 7%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे 7%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे 7%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे 7%

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/save/deposits/fixed-deposit-interest-rate

हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदी महागले, आजची किंमत तपासा
Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ
7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या