HDFC Bank Home Loan : HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का!! Home Loan वरील व्याजदरात वाढ

HDFC Bank Home Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच बँकेने Home Loan वरील व्याजदरात वाढ (HDFC Bank Home Loan) केली आहे. HDFC बँकेने त्यांच्या रेपो-लिंक्ड होम लोनवरील व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या वाढीनंतर गृहकर्जावरील व्याजदर 8.70 ते 9.8 टक्क्यांपर्यंत आले आहेत. जे ग्राहक घरासाठी HDFC बँकेचे कर्ज काढण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

HDFC बँक आणि HDFC च्या विलीनीकरणामुळे गृहकर्ज दरांमध्ये हा बदल झाला आहे आणि आता तो रिटेल प्राइम लेंडिंग रेटशी (RPLR ) जोडला जाणार नाही तर EBLR (बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट) शी जोडला जाईल. बाह्य बेंचमार्क कर्ज दर RBI रेपो रेटशी जोडलेला आहे. जे ग्राहक HDFC बँकेकडून नव्याने गृहकर्ज घेतील त्यांच्यासाठी नवीन रेपो लिंक्ड व्याजदर लागू होतील. जे जुने ग्राहक आहेत ते RPLR आहे तसेच सुरू ठेवू शकतात.

इतर बँकांचे व्याजदर किती?

इतर बँकांचे होम गृहकर्जावरील व्याजदर (HDFC Bank Home Loan) बघितले तर, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के व्याज आकारत आहे, ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.75 ते 9.65 टक्के दराने होम लोन ऑफर करते, कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्जवरील व्याजदर 8.70 टक्के आहे. तर ICICI बँक आपल्या ग्राहकांना 9 टक्के ते 10.05 टक्के व्याजदराने गृहकर्जाची सुविधा देत आहे.

गृहकर्जासाठी पात्रता काय हवी? HDFC Bank Home Loan

कोणताही ग्राहक त्यांचे उत्पन्न आणि परतफेड क्षमतेच्या आधारवर गृहकर्ज घेऊ शकतात.
त्यासाठी सदर ग्राहकाचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे असावे
पगारदार व्यक्तींसाठी किमान उत्पन्न दर महिन्याला 10,000 रुपये असावे
स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींचे कमीत कमी उत्पन्न हे दर वर्षासाठी 2 लाख रुपये असावे.